विरार मध्ये गायिकेवर लाखो रुपायांचा पैशांचा पाऊस; पोलिसांनी घेतली दखल

Singing event in virar
Singing event in virarsakal media

नालासोपारा : गुजराती समाजातर्फे (Gujrati community) विरारमध्ये शनिवारी (ता. 19) रात्री झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात एका गायिकेवर (singer) लाखो रुपयांची उधळण (lac rupees tip) झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याबाबत सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओची विरार पोलिसांनी (virar police) दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, गुजराती समाजाने कार्यक्रमातून जमा झालेला पैसा समाजाच्या कामासाठीच वापरला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Singing event in virar
अनावश्यक औषध मूत्रपिंडासाठी धोकादायक - डॉ. तात्याराव लहाने

स्वयंचैतन्य शक्तिपीठ आनंद धाम गोशाळेच्या माध्यमातून विरार पूर्वेतील रायपाडा परिसरातील गोशाळेत शनिवारी रात्री ९.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवणी आराधक गोविंदभाऊ गाढवी आणि लोकसाहित्यिकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याचा हा धार्मिक कार्यक्रम होता.

या कार्यक्रमात गायिकेचे गाणे चालू असताना पैशांची उधळण करण्याची स्पर्धाच उपस्थितांमध्ये लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन ते तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. वसई-विरारसह मिरा भाईंदर, पालघर, मुंबई, ठाणे, गुजरात व महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो गुजराती नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Singing event in virar
मुंबई : ‘एमटीएचएल’ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्याची योजना

पैसे समाजासाठीच

गीताबेन रबारी ही गुजरात, राजस्थानची प्रसिद्ध गायिका आहे. गुजरातमध्ये तर पैशांत ती अर्धी बुडून जाते. ही आमची धार्मिक प्रथा आहे. वसई- विरारसह मुंबई-ठाणे परिसरात राहणारा आमचा समाज हा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये एकदा एकत्र येतो. त्या कार्यक्रमात अनेक जण देणगी देतात. तो पैसा समाजोपयोगी कामासाठी वापरण्यात येतो. गायिकेच्या कार्यक्रमात जमलेला पैसा हा सर्व तेथील गोशाळेला दिला जातो. ते पैसे कोणीही घेऊन जात नाहीत, असे गुजराती समाजाच्या अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

"पैशाच्या उधळपट्टीचा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. संबंधित कार्यक्रमाबाबत आमच्याकडे कोणतीही नोंद किंवा परवानगी घेतलेली नाही. त्यात कोविडसंबंधी नियमांचे उल्लंघन झाले आहे का? तसेच पूर्ण कार्यक्रमाविषयी चौकशी करून कारवाई करू."
- सुरेश वराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विरार ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com