Mumbai News 
मुंबई

Mumbai News: IIT पवईमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन? विवेक विचारमंच आक्रमक, कारवाई करण्याची मागणी

आयआयटी इमारतीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले

Sandip Kapde

Mumbai News: इस्राइल-पॅलेस्टाईनचा वाद आता भारतातील शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतल्या आयआयटी पवईमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे समर्थन केल्यावरुन गदारोळ माजला. याविरोधात मुंबई विवेक विचार मंचानं आयआयटीबाहेर ठिय्या आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी हमासच्या क्रौर्याच्या समर्थनात एका व्हर्च्युअल कार्यक्रमात समर्थन केल्याचा आरोप विवेक मंचाने केला आहे.

आयआयटीत काय घडलं?

6 नोव्हेंबर 2023 रोजी प्राध्यापक शर्मिष्ठा साहा यांनी अभ्यासक्रमासंदर्भात एका डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगचं आयोजनं केले होते. यासाठी अतिथी वक्ते सुधन्वा देशपांडे यांनी आपली भूमिका मांडली. त्यामध्ये त्यांनी पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांच्या कृतीचे समर्थन केले, असा आरोप करत आज विवेक विचार मंच संघटनेकडून करण्यात आला.  (Latest Marathi News)

अशा प्रकारे दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित लोकांचे फोन रेकॉर्ड चेक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी एकत्र येत हातात आयआयटीच्या निषेधाचे बॅनर घेऊन ठिय्या आंदोलन केले.

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

प्रा. शर्मिष्ठा साहा यांनी इस्राईल-पॅलेस्टाईनच्या युद्धादरम्यानच्या खोट्या घटना सांगत विद्यार्थ्यांच्या भावना भडकवण्याचं काम केलं आहे. वक्त्या सुधन्वा देशपांडे यांना आमंत्रित करण्यासाठी प्रा. साहा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच या लेक्चरदरम्यान, पॅलेस्टिनी दहशतवादी झकारिया झुबेदीचा गौरव करण्यात आला. यामुळं विद्यार्थ्यांमध्ये विषयासंबंधी दिशाभूल करुन दहशतवादाशी संबंधित विचारसरणीच्या प्रचार केला गेला आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची पवई पोलिसांना चौकशी करावी असंही तक्रारीत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT