Sharad Pawar : अजित पवारांनी शरद पवारांच मन वळवलं? दिल्ली भेटीवरून रवी राणा यांचा खळबळजनक दावा

अपक्ष आमदार रवी राणा यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर खळबळजनक दावा केला आहे.
mla Ravi Rana on  Ajit Pawar meeting Sharad Pawar and Amit Shah political news
mla Ravi Rana on Ajit Pawar meeting Sharad Pawar and Amit Shah political news

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचा वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळ राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रवी राणांचं मोठं वक्तव्य...

रवी राणा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने अजित पवार हे शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मोदींसोबत यावं, ज्यामुळे राज्याचं भलं होईल, राज्य सरकार मजबूत होईल, जनतेचे काम होतील. मला वाटतं की, पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात गोष्टी मान्य केल्या असतील. कुठंतरी पवार साहेबांच्या भेटीत अनेक रहस्य दडलेली आहेत. लगेच अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली, तेथे राजकीय चर्चा सुद्धा झाली असेल.

मोदीजींचं काम बघून नक्कीच पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्यासाठी पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील, असं सध्या चित्र आहे असेही रवी राणा म्हणाले आहेत.

mla Ravi Rana on  Ajit Pawar meeting Sharad Pawar and Amit Shah political news
Lalit Patil Drugs Case: ललित पाटील हॉटेलवर दर महिन्याला खर्च करत होता 'इतके' लाख, वर्षभर खोली राहत होती आरक्षित

नेमकं झालं काय?

शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाली. त्यानंतर अजित पवार लगेच दिल्लीच्या दिशेने रवाना झाले . अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दोन्ही भेटींनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान या भेटीसंदर्भात आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे.

mla Ravi Rana on  Ajit Pawar meeting Sharad Pawar and Amit Shah political news
Maratha Reservation : सरकारने तातडीने लेखी मसुदा द्यावा; कुणबी नोंदी तपासणीसाठी मनुष्यबळ वाढवा - मनोज जरांगे

भेटीवर शरद पवार काय म्हणाले?

काल झालेल्या या भेटीबद्दल बोलताना शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी सांगितलं की, प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंबिय एकत्र आले होते. ही कौटुंबिक भेट होती. यावेळी सहकुटुंब जेवणही झालं. खूप दिवसांनी आम्ही सर्व भावंड एकत्र जमलो भेटून सर्वांना आनंद वाटला. यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच शरद पवार यांनी देखील माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की, "आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती,"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com