मुंबई

भिवंडीतील पॉवरलूम येताहेत पूर्वपदावर; दोन शिफ्टमध्ये सुरू आहे काम....

संजय घारपुरे

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील उद्योगधंदे बंद पडले होते. मात्र, लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असताना मुंबईसह राज्यातील उद्योगधंदे अटी आणि शर्थींसह सुरु करण्यात आले होते. अशाचप्रकारे लॉकडाऊन भिवंडीतील अनेक पॉवरलूमचे काम बंद पडले होते. तेथील अनेक कामगार गावीही गेले होते. मात्र आता काही अटींवर या लूम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता कामगारही परतल्यामुळे काही लूममध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरु झाले आहे. 

अनलॉक सुरु झाल्यावर तसेच पॉवर लूम सुरु होण्याची परवानगी मिळाल्यावर तिथे 25 ते 30 टक्के काम सुरु झाले होते. मात्र आता कामाचे तास वाढले आहेत. मुंबईतील कापड मार्केट सुरु झाले, त्यांनी भिवंडीतील या गिरण्यातून कापड खरेदी सुरु केल्यावर येथील गिरण्यातील कामाला वेग येईल, अशी अपेक्षा बाळगून असल्याचे वृत्त आहे.

जब्बार कम्पाऊंड, फैजान कम्पाऊंड, भंडारी कम्पाऊंड, नालापार इलाका, खाडीपार, चाविंद्रा, सावंदे, सोनाले भागातील लूममध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरु झाले आहे. मोहरमनंतर बहुतेक सर्व कामगार गावाहून परततील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भिवंडी तसेच परिसरात सुमारे सात लाख पॉवरलूम आहेत.  त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेले अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. या ठिकाणी देशातील सर्व राज्यातील कामगार काम करतात. आता या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था असलेल्या खानावळी बंद झाल्यानेही अनेक कामगार घरी परतले होते. 

आता परत आलेल्या कामगारांची कोरोना चाचणी करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी भिवंडी महापालिकेने लूममध्ये जाऊन चाचणी करावी, अशीही सूचना केली जात आहे. लूममध्ये काम सुरु असले तरी प्रशासकीय काम ऑनलाईनच सुरु आहे. 
---
संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT