खोपोलीतही बंद  
मुंबई

खोपोलीत व्यापारी-बंद समर्थकांत खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा

खोपोलीः सीएए व एनआरसीविरोधात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाकडून राज्यव्यापी बंदचे आंदोलन करण्यात आले होते. खोपोलीतही बंद यशस्वी होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी शहरातील व शीळ फाटा येथील दुकाने व बाजार बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले.

दरम्यान, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतलेल्या निर्णयानुसार कोणताही व्यापारी आपले दुकान बंद ठेवणार नाही या भूमिकेवर येथील व्यापारी असोसिएशन ठाम होते. शीळ फाटा येथे दुकाने बंद करण्याचे निर्देश देणाऱ्या बंद पुरस्कर्ते व दुकाने बंद होणार नाहीत, अशी भूमिका घेतलेल्या व्यापारी वर्गात जोरदार खडाजंगी जुंपली व वाद निर्माण झाला.
 
पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर शीळ फाटा येथे दाखल झाले. त्यांनी बंद पुकारणारे तसेच व्यापारी आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात विशेष बैठक घेऊन समेट घडवून आणली. त्यानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे बंद पुरस्कर्त्यांकडून मान्य केल्यावर येथील वातावरण निवळले. निर्माण झालेल्या बिकट स्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र फक्के, राजू अभानी, कमाल पाटील व अन्य सदस्यांनी यशस्वीपणे मध्यस्थी मार्ग काढण्यासाठी योगदान दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT