Court 
मुंबई

बलात्कार, हत्येच्या तपासात ढिसाळपणा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला. 

या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीची शिक्षेला नाझीर खान या दोषीने उच्च न्यायालयात केलेल्या अपील याचिकेवर सोमवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने दोषीची फाशीची शिक्षा रद्द केली; मात्र पुरावे नष्ट केल्याबद्दल भारतीय दंड विधानातील कलम क्र. २०१ खाली त्याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

विलेपार्ले येथे २०१२ मध्ये बेपत्ता झालेल्या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह घरापासून जवळच सापडला होता. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली; मात्र काही दिवसांनी खान याला अटक करून बलात्कार व हत्येचा गुन्हा नोंदवला. त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत प्लायवूड पडल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी बेजबाबदारपणे तपास केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT