Diva BJP
Diva BJP sakal media
मुंबई

भाजपात 'आऊटगोईंग', आमदार म्हणतात, गर्दी जमवण्यापेक्षा पाच निष्ठावान कार्यकर्ते पुरेसे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : दिव्यातील भाजपच्या (BJP) दोन मंडळ अध्यक्षांना शिवसेनेने (Shivsena) आपल्या चमूत खेचल्याने दिव्यातील भाजपचा नविन मंडळ अध्यक्ष कोण याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती. निष्ठावंत पदाधिकाऱ्यावरच ही जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे बोलले जात असल्याने गेले अनेक वर्षे भाजपचा झेंडा हाती धरलेले रोहीदास मुंडे (Rohidas Munde) यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत होते. अखेर रविवारी दिवा मंडळ अध्यक्षपदी मुंडे यांची नियुक्ती करत पक्षाने त्यांच्यावर दिव्याची (Diva) जबाबदारी सोपविली आहे.

भारतीय जनता पार्टी दिवा शहर यांच्यावतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी रोहिदास मुंडे यांची दिवा मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी दिव्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्षप्रवेश देखील केला.

आमदार चव्हाण यांचा खासदार शिंदे यांच्यावर हल्लाबोल

भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत व निलेश पाटील यांना शिवसेनेने आपल्या चमूत घेत विरोधक भाजपाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आमदार चव्हाण यांनी सेनेवर निशाणा साधत म्हणाले, गर्दी जमविण्यापेक्षा आमच्याकडे निष्ठावान कार्यकर्ते किती आहेत हे पाहिले पाहीजे. निष्ठावान कार्यकर्ते पाच जरी असले तरी पाच जणांच्या जोरावर आपण काय करू शकतो हे आता दाखवून देऊ.

त्यानंतर चव्हाण यांनी थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवेकरांसाठी एक हॉस्पिटल करणे गरजेचे होते. मात्र त्यांच्या येथील बगलबच्चासाठी त्यांनी हे केले नाही. येथील भूखंड गिळंकृत करून त्यावर अनधिकृत बांधकाम त्यांना उभारायचे आहे असे ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी विकासाचा कसा बट्ट्याबोळ केला हे आपण सर्वच जाणतो. दिव्याची लोकसंख्या आज अडीच लाखाच्या घरात गेली असून येथे एक हॉस्पिटल व्हावे यासाठी भाजपा संघर्ष करेल असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT