मुंबई

कोरोनाचा 'आरटीओ'लाही फटका; महसूल घटल्याने 'या' वाहनधारकांकडे वळवणार मोर्चा

राहुल क्षीरसागर

ठाणे : कोरोनामुळे पुकारलेल्या टाळेबंदीचा सरकारी कार्यालयांनाही फटका बसला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन विभागही सुटले नसून, कोरोनामुळे यावर्षी वाहन विक्री मंदावल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या महसुलात कमालीची घट झाली. त्यामुळे ही घट भरून काढण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जुन्या वाहनांवरील थकीत कर वसुलीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, कर थकबाकी असलेल्या वाहन धारकांना 'डिमांड नोटिसा' पाठविण्यात येत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. जिल्ह्यातील परिवहन विभागांना दरवर्षी वाहन खरेदीतून मोठे उत्पन्न मिळते. रस्ते कर, पर्यावरण कर, वाहन नोंदणी कर, परवाना नूतनीकरण कर, परमीट कर अशा विविध करांच्या स्वरुपात कोट्यवधींचा महसूल गोळा होतो. त्यातच जानेवारी ते जुलै या कालावधीत बस, जड-अवजड वाहने आणि चारचाकी वाहनांची खेरदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या सात महिन्यांत ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तिन्ही उप प्रादेशिक कार्यालयांमधून 250 कोटींहून अधिक महसूल मिळतो.

यंदा मात्र कोरोनामुळे वाहन विक्रीत कमालीची घट झाल्याने त्याचा परिणाम महसुलावर झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत यंदा घट झाल्याचे दिसून आले. महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी जुने थकीत कर वाहनधारकांना डिमांड नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या जुन्या थाकीबाकीधारकांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून महसुलातील घट भरून काढण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा प्रादेशिक परिवहन विभागाने केला आहे.

कोरोनामुळे नागरिकांचा नवीन वाहन खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला करातून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी जुने कर थकीत वाहनधारकांना डिमांड नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 
- रवी गायकवाड, 
प्रादेशिक परिवहन विभागप्रमुख, ठाणे  

---------------------

(संपादन : प्रणीत पवार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : निफाड तालुक्यातील दुर्दैवी घटनेनंतर आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT