esakal | गणेश भक्तांना दिलासा; बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी 
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश भक्तांना दिलासा; बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी 

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी सरकारने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. असे असताना आता ठाणे शहरातील गणेशमूर्ती कारखानदारांनी देखील कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता खबदारीची उपयायोजना म्हणून आठ दिवस आधीच मूर्ती घेऊन जाण्याबरोबर गणरायाची मूर्ती घरपोच नेऊन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाप्पाची घरपोच सेवा भक्तांना मिळणार आहे. 

गणेश भक्तांना दिलासा; बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी 

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी सरकारने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. असे असताना आता ठाणे शहरातील गणेशमूर्ती कारखानदारांनी देखील कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता खबदारीची उपयायोजना म्हणून आठ दिवस आधीच मूर्ती घेऊन जाण्याबरोबर गणरायाची मूर्ती घरपोच नेऊन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाप्पाची घरपोच सेवा भक्तांना मिळणार आहे. 

क्लिक करा : भाऊ, ताई, मुंबईत कोरोना संपला का? मग अस का बरं वागताय?

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुणे आणि ठाणे शहरातील अनेक मोठ्या मंडळांसह लहान मंडळांनी देखील सध्या पद्धतीने व आरोग्य विषयी उपक्रमांचे आयोजन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका प्रशासनांनीही गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातील मागर्दर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

यामध्ये घरगुती गणपती मूर्तीची उंची 2 फुटापर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 4 फूट उंच मूर्तीची मर्यादा ठेवण्यासह सार्जनिक मंडळांनी मंडपांमध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य केले आहे. तसेच मंडपामध्ये थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्‍सिमीटरच्या माध्यमातून भाविकांची तपासणी करावी, त्यांची नोंद ठेवावी, मंडपामध्ये पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, प्रत्येकाने मास्क लावणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. 

सावधान, तुमचा ई-पास बनावट असू शकतो

दुसरीकडे गणेशमूर्ती कारखानदारांनी देखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच गणेश चतुर्थीला अथवा आदल्या दिवशी गणरायाची मूर्ती घरी घेऊन जाताना भाविकांची केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गजानन चित्र मंदिर केंद्राच्या वतीने आठ दिवस आधी मूर्ती घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर, श्री गणेश कलानिकेतन केंद्र चालकांनी बाप्पांची मूर्ती घरपोच पोहोचविण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना आता गणरायाची मूर्ती घेण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नसून थेट बाप्पाच आपल्या घरी येणार आहे. 


यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे आमच्याकडून गणपती बाप्पांची मूर्ती घेणाऱ्या ग्राहकांशी फोनद्वारे संपर्क करून बुकिंग स्वीकारण्यात आल्या. तसेच कोरोनाचा संसर्ग व केंद्रावर गणेश मूर्ती घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा बाप्पांची मूर्ती ग्राहकांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. 
- दीपक वेदपाठक, 
श्री गणेश कला निकेतन, ठाणे 

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी गणेशाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी 15 ऑगस्टपासून मूर्ती घरी घेऊ जाण्यासाठी भाविकांना सांगण्यात आले. 
- सुरेश बोळीजकर, 
गजानन चित्र मंदिर, ठाणे. 

loading image