salary increment gift of Rs 4455 to workers of Century Company in ulhasnagar three years contract
salary increment gift of Rs 4455 to workers of Century Company in ulhasnagar three years contract Sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरातील सेंचुरी कंपनीच्या कामगारांना 4455 रुपयांची पगारवाढीची गिफ्ट, तीन वर्षांचा करार

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर -मागील वर्षी दिलेल्या 3555 रुपयांच्या पगार वाढीत 900 रुपयाची भर मान्य करून उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या कामगारांना एकूण 4455 रुपयांची भरघोस पगारवाढीची गिफ्ट जाहीर करण्यात आली आहे.

पगारवाढीच्या कराराचा कालावधी 31 मार्च 2027 पर्यंत असणार असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली आहे.या करारात युनियनचे सल्लागार खासदार कपिल पाटील आणि अध्यक्ष रवींद्र कोनकर यांनी महत्वाची भूमिका निभावली असल्याचे लालका यांनी सांगितले.

सेंचुरी रेयॉन कंपनीत चार हजार पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत.उल्हासनगर आणि कल्याण या दोन शहरांचे अर्थकारण हे कंपनीच्या विकासावर अवलंबून आहे.2022 मध्ये सेंचुरी कंपनीत रेयॉन वर्कर्स युनियन निवडून आली.

या युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर हे झाले.युनियनच्या सल्लागार पदी भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची नेमणूक करण्यात आली. मागील वर्षी झालेल्या करारात 3555 रुपयांची पगारवाढ करण्यात आली होती.यंदा ही वाढ भरघोस करण्यात यावी,अशी मागणी कामगारांनी उचलून धरली होती.

बुधवारी दुपारी कल्याणच्या स्प्रिंग्ज टाईम हॉलमध्ये रेयॉन वर्कर्स युनियन आणि कंपनी प्रशासन यांच्यात बैठक पार पडली.या बैठकीत युनियनचे प्रमुख सल्लागार खासदार कपिल पाटील,युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर,उपाध्यक्ष कृष्णा पाटील,महामंत्री रमेश यादव,प्रमोद काळे,राजेश सिंह,

खासदारांचे सहयोगी सुनील राणा आदी कमिटी पदाधिकारी उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाकडून दिग्विजय पांडे,योगेश शहा,श्रीकांत गोरे,अनिल सेहल,प्रकाश देसाई,मिलिंद भांडारकर आणि फायनान्स हेड योगेश शहा आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जवळपास तीन ते चार तासाच्या चर्चेनंतर मागील वर्षी दिलेल्या 3555 रुपयांच्या पगारवाढीत 900 रुपयाची भर मान्य करीत 4455 रुपयांची भरघोस वाढ मंजूर करण्यात आली. या कराराचा कालावधी 31 मार्च 2027 पर्यंत असणार असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली.

करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती सेंचुरी रेयॉन कंपनीतील कामगारांमध्ये पोहोचतात त्यांनी कंपनीच्या गेटवर जमत फटाकेबाजी करून एकच जल्लोष साजरा केला.मागील दोन वर्षांपासून नवीन युनियन आल्यावर कामगारांच्या हिताचे अनेक प्रश्न सोडवले जात आहेत. तसेच पगार वाढीत कामगारांकडून अधिक काम करून घेणे अश्या कोणत्याही जाचक अटी टाकल्या जात नसल्याचे कामगारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT