Sanjay Raut on Nagpur Visit  e sakal
मुंबई

'माथेफिरूकडून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी होतीय'

ओमकार वाबळे

महाराष्ट्रात सध्या भोंग्यांच्या प्रकरणावरून राजकारण पेटलं असून राज्यभर तणाव निर्माण झाला आहे. त्यातच राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास केल्याने वातावरण आणखी तापलं. या प्रकरणात किरीट सोमय्यांनी उडी घेतली.

यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यात सोमय्यांना दुखापतही झाली. मात्र, स्वत:च नख मारून हे केल्याची टीका सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. ओठांखाली टोमॅटो सॉस लावून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी कोणी करत असेल,तर त्याकडे लक्ष देणार नाही, असं राऊत यांनी म्हटलंय. (Sanjay Raut Alleges Kirit Somaiya over Matoshree Attack)

भाजपला आलेली लोकशाहीची उबग ही राष्ट्राच्या हिताची

भाजपचे नेते लोकशाहीविषयी प्रवचनं देत आहेत. ही आनंदाची गोष्ट. सरकार येऊ शकलं नाही त्यामुळे हे अस्वस्थ झाले आहेत. ही अस्वस्थता असल्याने त्यातून उबग आली आहे. न्यायालयं आणि विरोधी पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी एखादा माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल, तर अशा मूर्खपणाकडे दूर्लक्ष्य केलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था कोसळणं काय असतं हे उत्तर प्रदेशाकडे पाहून केलं पाहिजे.

येणाऱ्या २५ वर्षातही त्यांची सत्ता महाराष्ट्रात येणाची शक्यता नाही. यामुळे भाजपने आता फडणवीसांच्या घरी बसून हनुमान चालिसा पठण करावं, असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT