Kishori Pednekar on Kirit Somaiya |...अशा जखमा दाढी करताना पण होऊ शकतात; पेडणेकरांचा सोमय्यांवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori Pednekar on Kirit Somaiya, Attack on Kirit Somaiya

...अशा जखमा दाढी करताना पण होऊ शकतात; पेडणेकरांचा सोमय्यांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रात सध्या भोंग्यांच्या प्रकरणावरुन राजकारण पेटलं असून राज्यभर तणाव निर्माण झाला आहे. या वादाच्या विषयावर मुख्यमंत्र्यानी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती पण त्या बैठकीला अनेकजणांची गैरहजरी होती. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Mayor Kishori Pednekar On Raj Thackeray and Kirit Somaiya)

राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्याच्या वक्तव्यावरून राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या वादातून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करत दोषी ठरवले होते. त्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीत काल राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच चिडलेल्या शिवसैनिकांनी भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला त्यामध्ये त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. (Kishori Pednekar on Kirit Somaiya)

हेही वाचा: बाळा नांदगावकरांसह मनसेचे 2 दिग्गज नेते सह्याद्रीकडे रवाना, घडामोडींना वेग

ह्या प्रकरणावर सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे आणि भाजपाचे नेते गैरहजर होते त्यानंतर महापौर किशोरी पेडणोकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, सर्वांशी भोंग्यांच्या विषयावर चर्चा व्हावी याकरता बैठक बोलावली होती. पण त्या बैठकीला अनेकांची गैरहजरी होती. बैठकीला येऊन मतं मांडायची नाही अन् नंतर स्क्रीप्ट वाचून दाखवायची याला काही अर्थ नाही. अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

तसेच किरीट सोमय्या हे त्यांच्यावरील हल्ल्याच्या संदर्भात माहिती द्यायला दिल्लीला गेले ते ठीक आहे पण अशा जखमा दाढी करताना सुद्धा होतात, असं त्या बोलताना म्हणाल्या. मी सुद्धा किरीट सोमय्यांची जखम पाहीली, ती सुपरफिशीयल जखम वाटते, दगड मारल्याने जखम झाली तर रक्त गळत राहीलं असतं, काच लागली असती तर ती अडकली असती, दाढी वगैरे करताना अश्या प्रकारची जखम होऊ शकते असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलं आहे.

हेही वाचा: पाकिस्तानी नौकांमधून 300 कोटींचे हेरॉईन जप्त; 9 जणांना अटक

इथे केंद्राचे कितीही पथकं येऊद्या आम्ही घाबरत नाही, इथे अनेक पथकं आली आहेत. दिल्लीचा आधार मुंबईला मिळत नाही. असं त्या केंद्रावर निशाना साधताना म्हणाल्या.

Web Title: Kishori Pednekar On Kirit Somaiya And Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top