आमदारांनी फाडली इंग्रजी भाषेतील कागदपत्रे 
मुंबई

मराठीच हवी! शिवसेना आमदाराने इंग्रजी कागदपत्रे फाडली 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंधेरी-कुर्ला रस्तारुंदीकरणात बाधित होणारे घरमालक आणि दुकानदारांच्या नावाची यादी मराठीऐवजी इंग्रजीत सादर केल्याने संतप्त झालेले शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी पालिका अधिकाऱ्यांना सोमवारी चांगलाच दणका दिला. चेंबूर पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी सादर केलेली इंग्रजी कागदपत्रे लांडे यांनी फाडून भिरकावली. मराठी भाषेचा मान राखण्याचा सल्ला लांडे यांनी दिला. त्यांच्या पवित्र्याने हबकलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने मराठी कागदपत्रे सादर करू, अशी हमी दिली.

ही बातमी वाचली का : भविष्यात मनसे देणार भाजपला साथ?

अंधेरी-कुर्ला रस्तारुंदीकरणाच्या कामासंदर्भात चेंबूरच्या एम पश्‍चिम प्रभाग कार्यालयात सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. कामामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांची व घरमालकांची नावांची यादी पालिका अधिकाऱ्यांनी इंग्रजीत सादर केली. त्यामुळे चांदिवलीचे आमदार लांडे संतप्त झाले. 

ही बातमी वाचली का ः ठाण्यात मेट्राे कारशेडचा सर्व्हे शेतकऱ्यांनी उधळला

राज्यकारभाराची व महापालिकेच्या कारभाराची भाषाही मराठी आहे. तसे जीआरही काढण्यात आलेले आहेत. तरीही असा प्रकार घडतो हे चुकीचे आहे. यानंतरही असा प्रकार घडला तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही लांडे यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

मराठीचा अपमान सहन करणार नाही! 
गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली आहे. मराठी वापराचा सरकारी निर्णय असतानाही अधिकारी इंग्रजीत कामकाज करतात. त्यामुळे आपण ती कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. मराठी भाषेचा असा अपमान आपण सहन करणार नाही. पुन्हा जर असे केले तर अधिकाऱ्यांना आणखी कडक उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया दिलीप लांडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT