esakal | भविष्यात मनसे देणार भाजपाला साथ ? बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य..
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्यात मनसे देणार भाजपाला साथ ? बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य..

भविष्यात मनसे देणार भाजपाला साथ ? बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेने आपला झेंडा बदलण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरे यांच्या मनसेचा झेंडा आता केशरी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता आपला झेंडा बदलून प्रखर हिंदुत्त्वाकडे वाटचाल करतोय असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक विधान केलंय. या विधानामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपाला साथ देणार का ? महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने शिवसेनेची हिंदुत्त्वाची पोकळी मनसे भरून काढणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. 

धक्कादायक : काय झालंय विचारलं की 'तो' सांगायचा TB आहे, पण त्याला तर होता....

प्रश्न : पक्ष स्थापन करून तेरा वर्ष झालीत? येत्या काळात काही नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतील का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप एकत्र येताना पाहायला मिळतील का ?

उत्तर : कुणासोबत समीकरण जुळेल मी सांगू शकत नाही. मात्र मला आवठवतंय, शिवसेनेला देखील आम्ही मदत केली आहे, भारतीय जनता पक्षाला आम्ही मदत केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशील आम्ही मदत केली आहे, शेकापला केली, राजू शेट्टी याना देखील केली. मात्र आम्हाला त्याची कितपत मदत झाली हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही कुणासोबत जायचं, नाही जायचं हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. मात्र एक लाईन पक्षाने घेतली , तर कोणताही चमत्कार घडू शकतो. कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो. त्यामुळे येत्या काळात लोकांच्या मनात जे आहे, ते घडताना पाहायला मिळेल.   

राज ठाकरे यांनी कायम अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी राबवलेल्या योजनांवर टीका केलेली पाहायला मिळाली आहे. अशात ते एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चांगले नेते आहेत अशी स्तुती देखील करताना पहिला मिळालीये. मात्र अशात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज केलेलं वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरतायत. 

WebTitle : bala nandgaonkar statement says in future maharashtra will see what everyone always wanted 

loading image