Sada Sarvankar Sakal
मुंबई

Sada Sarvankar: बंदूक सदा सरवणकर यांचीच, पण गोळी...; पोलिसांच्या अहवालात स्पष्ट

रुपेश नामदास

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना मोठा दिलास मिळाला आहे. गेल्या वर्षी गणेश विजर्सन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गोळाबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आज पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रभादेवी परिसरात सदा सरवणकर यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. विशेष म्हणजे ती बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, मात्र गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचा पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सरवणकर यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पार पडली. पण प्रभादेवी येथील मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती. या राड्यावेळी दादर पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली होती.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवाल आला. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले होते. ती जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळत होते. मात्र आज पोलिसांनी सादर केलेल्या आवाहालात सरवणकर यांनी गोळी चालवली नसल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे-मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! १० दिवसांनंतर 'डेक्कन क्वीन' पुन्हा रुळावर; 'इंटरसिटी'ही आजपासून सुरू

Nagpur News: एसटी प्रवाशांना दिलासा नाही! साध्या बसच्या 10% भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, 1 ऑगस्टपासून पूर्वीचे दर

Latest Marathi News Live Update : 'पुणे ग्रँड टूर'साठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार; 137 कोटींच्या खर्चाला मान्यता

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

SCROLL FOR NEXT