SSC Exam Time Table: 'ही विद्यार्थ्यांची चूक', दहावीच्या व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण

सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.
SSC Exam Time Table: 'ही विद्यार्थ्यांची चूक', दहावीच्या व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण

सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकामुळे अनेकांचा हिंदीचा पेपरच बुडाला आहे. त्यामळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवण ही विद्यार्थ्यांची चूक आहे. असं म्हणत व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे. (SSC Exam Time Table Social Media viral Hindi Paper)

एसएससी बोर्डाच्या वेळापत्रकात जो पेपर 8 मार्चला दाखवण्यात आला होता. तोच पेपर व्हायरल वेळापत्रकात 9 मार्चला दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. यावर आता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

SSC Exam Time Table: 'ही विद्यार्थ्यांची चूक', दहावीच्या व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण
Budget 2023 : कोणाच्या सरकारमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; अजित पवारांनी सांगितली आकडेवारी

ही विद्यार्थ्यांची चूक......

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवण ही विद्यार्थ्यांची चूक असल्याचे म्हटले आहे. त्यांना सांगितल होत व्हायरल होणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. पण त्यांनी ठेवला.

किती विद्यार्थ्यांचा पेपर चुकला आहे, त्याची लेखी आकडेवारी आलेली नाही. प्रत्येक विषयाचे विद्यार्थी वेगळे असतात. अधिकृत आकडेवारी मिळण्यासाठी उशीर लागतो. मात्र, एकूण ५० विद्यार्थ्यांनी पेपर दिले नसल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.

SSC Exam Time Table: 'ही विद्यार्थ्यांची चूक', दहावीच्या व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण
Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

आता हा चुकलेला पेपर देण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या जुलैच्या परिक्षेमध्ये पेपर द्यावा. नाहीतर दहावीला एटीकेटीचा पर्याय दिला आहे. दोन विषयात जरी विद्यार्थी पास झाला नाही तरीही त्याला अकरावी प्रवेश मिळतो. आणि ज्यांचा पेपर चुकला आहे त्यांनी जुलै महिन्यात पेपर द्यावा. या दोन पर्यायामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही वर्ष वाया जाणार नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वायरल झालेल्या वेळापत्रकाचा (Time Table) फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवून अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला आहे. दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर होता.

हॉल तिकीटावर देखील 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर असल्याचं बोर्डाकडून नमूद केलेलं आहे. मात्र आठ मार्चला हिंदीचा पेपर असतानासुद्धा काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवला.

SSC Exam Time Table: 'ही विद्यार्थ्यांची चूक', दहावीच्या व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! जपानी तरूणीसोबत भारतात गैरवर्तन; बळजबरी भिजवलं, लावला रंग; Video Viral

या व्हायरल झालेल्या वेळापत्रकामध्ये हिंदी विषयाचा पेपर हा 9 मार्च रोजी होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी 8 मार्चचा हिंदीचा पेपर जो हॉल तिकीटवरील वेळापत्रकानुसार होता, तो न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांची त्या पेपरला अनुपस्थिती लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com