sanjay raut criticize cm eknath shinde  Esakal
मुंबई

Sanjay Raut: गद्दारी आणि बेईमानी हा अंगार आहे का? हिंमत असेल तर स्वत:चा...; राऊतांचा शिंदेंवर पलटवार

Raut's counterattack on Shinde...

कार्तिक पुजारी

मुंबई- शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंगार घेऊन दसरा मेळावा होणार आहे. बाळासाहेब असताना आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला देशात महत्त्व प्राप्त करुन दिले आहे. अंगार कोण भंगार कोण हे लोक ठरवतील. तुमचे विचार लोक ऐकायला येणार असलील तर येऊ द्या, तुमच्या विचारांना आम्ही भंगार म्हणणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भंगार म्हणण्याइतपत तुमची जीभ घसरली आहे. तुम्ही मोदी-शाहांच्या कच्छपी लागला आहात हा बाळासाहेबांचा विचार नाही. त्यांचा स्वतंत्र विचार होता. त्यांनी नक्कीच शिवसेनेसोबत युती ठेवली पण आमचा विचार बदलू शकले नाहीत.

तुम्ही कोणता विचार देणार आहात. गद्दारी आणि बेईमानी हा अंगार आहे का? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वायब्रंट गुजारातचा कार्यक्रम आज मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहावे लागते हाच तुमचा अंगार आहे का? राज्यात उद्योगधंदे गुजरातला पाठवले जात आहेत. तुमच्या गळ्यात पट्टा बांधला आहे. आमच्या गळ्यात आम्ही कोणाचे पट्टे बांधून घेतलेले नाही, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या लोकांनी बाटवलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली केली होती. यावरुन संजय राऊत यांनी शिंदेंवर पलटवार केला.

दादर येथील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने अर्ज केला आहे. गेल्यावर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला होता. यावर्षी देखील त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT