Mumbai News esakal
मुंबई

Mumbai Crime: मुंबईत काय चाललंय? महिलेला पाहून तरुणाने काढली पॅन्ट, पोलिसांनी घेतली दखल Video Viral

Mumbai Crime News: महिलेने आपली तक्रार एक्स या सोशल माध्यमातून मुंबई पोलिसांकडे केली आहे. शिवाय पोलिसांनी या ठिकाणी अधिक सुरक्षा वाढवावी अशी विनंती देखील केली आहे.

Sandip Kapde

मुंबईच्या जुहू परिसरात एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रात्रीचे महिलांसाठी घराबाहेर पडणे सुरक्षित नाही. मात्र आता दिवसा देखील घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. जुहू येथील जानकी कुटीर परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने महिलेला आवाज देऊन महिलेसमोर पॅन्ट काढून गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे.

घटना आणि व्हिडिओ-

ही घटना सकाळी 8:55 वाजता घडली. महिलेने तरुणाचा चेहरा मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणावरून तरुणाने पळ काढल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेनंतर महिलेने निर्भया पथकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्भया पथकाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे या महिलेने म्हटले आहे.

एक्स पोस्ट वरून तक्रार-

यानंतर महिलेने आपली तक्रार एक्स या सोशल माध्यमातून मुंबई पोलिसांकडे केली आहे. शिवाय पोलिसांनी या ठिकाणी अधिक सुरक्षा वाढवावी अशी विनंती देखील केली आहे. मुंबई पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेतली आहे. पोलिसांनी महिलेचा संपर्क क्रमांक घेतला असून पुढील चौकशी सुरु आहे.

ही घटना महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. मुंबई पोलिसांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेतली असली तरी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT