siro survey 
मुंबई

मुंबईत ‘सिरो’ सर्वेक्षणातून कोरोनाच्या संक्रमणाचा कल कळू लागला; आतापर्यंत रक्ताच्या 'इतक्या' नमुन्यांचे संकलन..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने काही संस्थांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरापासून सिरो सर्वेक्षण सुरु केले आहे. मुंबईतील तीन विभागातील झोपडपट्ट्या आणि झोपडपटट्या नसलेल्या भागात सर्वेक्षण केले जाते आहे. या सर्वेक्षणातून नागरिकांच्या रक्तांचे नमुने घेतले जात आहेत. आतापर्यंत दोन हजार रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

मुंबई महापालिकेने निती आयोग, टीआयएफआर आणि इतर काही संस्थांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले जाते आहे. मुंबईत चेंबूर- गोवंडीचा भाग असलेला एम पश्चिम, परळ -शिवडीचा भाग असलेला एफ उत्तर आणि दहिसर या तीन व विभागांची निवड केली आहे. या भागात झोपडपट्टी व झोपडपट्टी नसलेल्या भागातही रहिवाशांच्या संमतीने हे सर्वेक्षण केले जाते आहे. यांमध्ये एकूण १० हजार नमुने (रॅण्डम ) संकलित करण्यात येणार आहे.  या उपक्रमाला झोपडपट्टी भागात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे २ हजार रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले असल्याचे  प्रशासनाने सांगितले.

सर्व परिसरामधील लोकांमध्ये संक्रमणाचा झालेला फैलाव समजून घेत त्याचे संनियंत्रण करणे हे अत्यंत निर्णायक स्वरुपाचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षण आधारित अभ्यासामध्ये शास्त्रीयदृष्टया ठरवून दिलेली यादृच्छिक पद्धत अवंलबण्यात येत असल्याच टीआयएफआरचे प्रा. उल्लास कोलथूर यांनी म्हटले आहे. 

अतिसंक्रमित भागांमध्ये या संक्रमणाचा होणारा भौगोलिक फैलाव व या संक्रमणाचे सामाजिक धोके समजून घेण्यासाठी या सर्वेक्षणाची मदत होणार आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८ वर्षांवरील व्यक्तींना यात सहभागी करून घेतले जात आहे. 

 रक्ताचे नमुने घेऊन त्यातील प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तपासण्यात येतील. रक्तात प्रतिपिंडे तयार होणे हे बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे लक्षण आहे. या माहितीच्या आधारे संक्रमणाचा सामुदायिक प्रसार रोखण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या संक्रमणाची लागण होण्याचा धोका असलेल्या इतर आजारांबाबत किंवा विशिष्ट वय, लिंग अशा गटांना असलेल्या त्यांच्या  धोक्याबाबत माहिती देण्यासाठी हे सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे. 
SIRO Survey in mumbai 2 thousand blood samples collected 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT