Train esakal
मुंबई

मुंबई-गोवा प्रवासासाठी सुपरफास्ट वनवे स्पेशल ट्रेन जाहीर; पाहा वेळापत्रक

८ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनीटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ही ट्रेन निघणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मध्य रेल्वेने मुंबई गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडीची घोषणा केली आहे. उन्हाळ्यातील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेतला असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. त्याासाठी रेल्वेने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई गोव्यासाठी एकेरी मार्गावर धावणारी सुपरफास्ट गाडी रेल्वेने जाहीर केली आहे. ८ जून २०२२ रोजी ही ट्रेन मुंबईतून सुटणार आहे.

(Special One Way Superfast Train For Mumbai Goa)

मुंबई गोव्यासाठीची १०१०९९ या क्रमांकाची वनवे स्पेशल ट्रेन ८ जून २०२२ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजून ५० मिनीटांनी सुटणार आहे. आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजून ३० मिनीटांनी मडगाव स्टेशनवर पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्टेशनवर थांबणार आहे.

दरम्यान या गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठी आजपासून ऑनलाईन तिकीटाचे बुकिंग करत येणार आहे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तिकीटे ४ जून म्हणजे आजपासून करता येणार आहेत. ४ द्वितीय श्रेणी सीट कार आणि आणि २ द्वितीय श्रेणी सीट कमगार्ड ब्रेक व्हॅन अनआरक्षित म्हणून धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Holika Dahan 2026: यंदा पहिल्यांदाच होळीची पूजा करताय? जाणून घ्या होलिका दहनाची विधिवत आणि योग्य पद्धत

Latest Marathi News Update : महिन्याभरात राज्यातील सगळ्या कार्यालयांचे पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाचे निर्देश

Accidental Death: शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू; बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना, शेतात जनावरे घेऊन गेले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT