
बिर्याणीसाठी वापरत होते शिळे मटण; प्रशासनाकडून रेस्टॉरंट सील
चेन्नई : एका बिर्याणी हॉटेलमध्ये शिळे मटण आढळून आल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. चेन्नईमधील वडापालणी मध्ये एका बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये तब्बल ७० किलो कालबाह्य मटण आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. त्यानंतर प्रशासनाने रेस्टॉरंट सील केले आहे.
(Expired Meat For Biryani)
अन्न आणि औषध प्रशासनाने २ जून रोजी एका रेस्टॉरंटमधून ७० किलो कालबाह्य मटण जप्त केले होते. ते शिळे मटण फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. ज्या तापमानात अन्न ठेवायला पाहिजे त्या तापमानात ठेवले नसल्याचं प्रशासनाला आढळून आलं होतं. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला असून आउटलेटच्या मालकांना नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) कडून कोल्ड चेन मॅनेजमेंटमध्ये प्रमाणपत्र घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर हे प्रमाणपत्र येईपर्यत रेस्टॉरंट प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे.
हेही वाचा: धुळ्याचा माला'माल' LIC किंग कंगाल; तिसऱ्या दिवशी 10 कोटींची संपत्ती जप्त
त्याबरोबर प्रशासनाने रेर्टॉरंटमधील सेवा आणि किचनमधील स्वच्छता सुधारण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जप्त करण्यात आलेले मटण आणि बिर्याणी राज्य अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचबरोबर ही कारवाई अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.
Web Title: Expired Meat In Biryani Food Safety Officers Seal Hotel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..