मुंबई

पोलिसांच्या तपासात सुशांतसिंग राजपूतबद्दल समोर आली 'ही' महत्त्वाची माहिती...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपुत पाच महिन्यांपासून तणावाखाली होता, त्यासाठी तो उपचार घेत होता. पाच दिवसांपूर्वी सुशांतने बहिणीला दूरध्वनी करून तणावाबाबत सांगीतलं होतं. त्यानंतर बहिण दोन दिवस सुशांतच्या घरी राहिली होती. तीन दिवसांपासून सुशांतने मानसिक तणावावरील गोळ्या खाणे बंद केल्याचे माहिती पोलिसांना सुशांतच्या नोकरांकडून मिळाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुशांत त्याचा वेळ पुस्तक वाचून घालवत होता. त्यामुळे रविवारी सुशांत बराच काळ रुममधून बाहेर पडला नाही. त्यामुळे नोकरांना अधिक संशय आला नाही. सुशांतला तासंतास पुस्तक वाचण्याची सवय असल्याची माहिती नोकराकडून मिळाली आहे.

सुशांत हा त्याच्या व्यवस्थापकासोबत मित्रासोबत रहायचा. त्यामुळे त्याला सुशांतच्या मोबाईलचा पासवर्ड माहिती असल्यामुळे पोलिसांना त्याच्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सुशांतने शनिवारी मध्यरात्री अभिनेता महेश शेट्टीला दूरध्वनी केला होता. पण त्याने तो उचलला नाही. त्यानंनतर शेट्टीने पुन्हा दुपारी 12 वाजता सुशांतला दूरध्वनी केला होता. पण तो फोन उचलला गेला नाही, त्यामुळे सुशांतचा मृत्यू सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान झाल्याचा संशय आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात सुशांतचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचे प्रथामिक माहिती शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट स्पष्ट होतेय. तीन डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केले. याशिवाय त्याच्या शरीरात अमली पदार्थ व मद्याचे अंश सापडले नाहीत. त्यामुळे आत्महत्या करतेवेळी सुशांत मद्य अथवा अमली पदार्थांच्या अंमलाखाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय सुशांतची आर्थिक परिस्थीती चांगली असल्याचेही बँक खात्यावरून स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी सुशांतचे तीन मित्र व कुटुंबियांकडून लवकरच सुशांतबाबत अधिक माहिती घेणार आहे. उद्या म्हगंजेच मंगळवारी ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सुशांतच्या घराचे न्यायवैधक तज्ज्ञांच्या पथकाने पाहणी केली. तीन तज्ज्ञ या पथकात होते.  सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलिस शोध घेत आहे. सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत.

sushant singh rajput case these important fact reveled in the police investigation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT