esakal | मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....

कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोर्स्टमार्टम झालं असल्याची माहिती समोर आली आहे

मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला. सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अशातच कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोर्स्टमार्टम झालं असल्याची माहिती समोर आली आहे. तर अवयव पुढील तपासासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आलेत. जे. जे. रुग्णालयात सुशांतच्या अवयवामध्ये कोणतंही विष की अन्य काही गोष्टी आहेत का याची तपासणी केली जाईल. दरम्यान सुशांतनं आत्महत्याच केली असल्याची माहिती पोस्टमार्टममधून समोर आली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना त्याच्या घरी उपचारांशी संबंधित एक फाईलही सापडली आहे. मात्र सुशांत औषधंही वेळेवर घेत नव्हता, असंही त्याच्या मित्रांकडून समजतंय. 

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केलीय. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. परंतु, पोलिसांना अद्याप कोणतीही संशयास्पद गोष्टही आढळलेली नाही.

सुरुवातीच्या माहितीनुसार सुशांतनं हिरव्या कपड्यानं आपल्या बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. याच कपड्याचा सुशांतनं गळफास म्हणून वापर केला होता. मध्यरात्री सुशांतनं एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला. पण त्यानं फोन उचलला नाही, त्यामुळे दोघांचं बोलणं झालं नाही.

अखेर लोकल ट्रेन धावली! पण केवळ मर्यादित प्रवाशांसाठी, 'या' आहेत अटी

रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुशांतने ज्यूस मागवला, आणि तो आपल्या खोलीत गेला. यानंतर सुशांतन बाहेर आलाच नाही. घरकाम करणाऱ्या नोकरांनी आणि मित्रानं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार लॉक होतं, अखेर नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलवलं. त्यानंतर दरवाजा उघडला. दार उघडल्यानंतर सुशांतचा मृतदेह पाहून नोकरांनी पोलिसांना फोन केला. दुपारी 12.45 वाजता सुशांतच्या बेडरूमचा दरवाजा तोडण्यात आला. सुशांतसोबत वांद्रे येथील घरात 4 लोकं राहत होती. यात दोन कुक, एक नोकर आणि एक आर्ट डिझायनर होता, जो त्याचा मित्रही आहे.

loading image
go to top