Water Supply sakal media
मुंबई

नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना दिलासा; प्रत्येक घरात नळजोडणी

सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवी मुंबई महापालिकेचे (Navi Mumbai municipal corporation) स्वत:चे धरण असतानाही नागरिकांना पालिका हद्दीत अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. पालिकेच्या हद्दीतील (Slum Area) झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी अजून सार्वजनिक नळ योजनेच्या माध्यमातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आता प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याची योजना महापालिका आखत आहे. या माध्यमातून प्रत्येक झोपडीमध्ये नळजोडणी दिली जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका शहरी भाग, गावठाण भाग आणि झोपडपट्टी भाग अशा तीन प्रकारांत याची विभागणी केली गेली आहे. अनधिकृत झोपड्या वाढत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या अधिकृत झोपड्यांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. झोपडपट्टी भागात असलेल्या सार्वजनिक नळांवर तर यामुळे दररोज भांडणे होत असतात.

नळजोडणीसाठी झोपडीधारकाकडून छाननी शुल्क व रस्ता खोदाई शुल्क घेतले जाणार नसून केवळ १०० रुपये सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाणार आहे. या पाणीपुरवठ्याच्या नवीन धोरणामुळे पाणीचोरीचे प्रकार थांबणार आहेत आणि अधिकृत झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

नळजोडणी घेण्यासाठी नळजोडणीचा अर्ज, सर्वेक्षण पावतीची प्रत, आधार कार्डाची प्रत, १ जानेवारी २०११ रोजीच्या अथवा त्यापूर्वीच्या झोपडीची प्राधिकृत वीज कंपनीने वीजजोडणी दिल्याची कागदपत्रे, अभिलेख किंवा देयक अथवा झोपडीसाठी महापालिकेने मालमत्ता कर आकारणी केल्याचा पुरावा ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT