
मुंबई: रुग्ण दुपटीचा कालावधी चार हजार दिवसांपार; मृत्यूच्या प्रमाणात घट
मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच रुग्ण दुपटीचा कालावधीत (Corona patients) चार हजार दिवसांच्या पलिकडे (bmc) गेल्याची नोंद करण्यात आली आहे. पालिकेच्या डॅशबोर्डच्या माहितीनुसार १ फेब्रुवारीला दुप्पट होण्याचा दर ४८५ दिवस होता, तर २५ फेब्रुवारी रोजी ४४५० दिवसांवर गेल्याची नोंद करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्ण, तसेच मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: कांजूरमार्गमध्ये अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्याला आग
कोणत्याही संसर्गजन्य आजाराचे दुप्पट होण्याचे प्रमाण पुनरुत्पादनाच्या संख्येवर अवलंबून असते. म्हणजेच एक रुग्ण किती जणांना बाधित करू शकतो हे त्याचे ढोबळ प्रमाण होय. सध्या ही पुनरुत्पादन संख्याच कमी झाली असल्याचे मत वैद्यकी तज्ज्ञ मांडत आहेत. ही पुनरुत्पादन संख्या वाढल्यास दुप्पट होण्याचा कालावधी कमी होतो.
तसेच ही संख्या कमी झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी वाढला असल्याचे मुंबईतील चित्र आकडेवारीवरून समोर येत आहे. यावर बोलताना राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, रुग्णसंख्या घटली असल्याने तिसरी लाट नियंत्रणात आली आहे. त्याच वेळी रुग्णदुपटीचा कालावधी वाढला आहे. ही सगळी तिसरी लाट संपल्याची लक्षणे आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..