मुंबई

गजानन महाराजांविषयीच्या त्या दाव्याबद्दल आयुष मंत्रालय करणार अभ्यास!

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जग जागतिक महामारीच्या संकटात अडकलं आहे. त्यात जगभरातले वैज्ञानिक कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता एका शिक्षकाला चक्क गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन कोरोनावरचा उपाय सांगितला असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आयुष मंत्रालयानं या गोष्टीला गंभीरपणे घेत यावर अभ्यास सुरु केला आहे.

कोरोनाचं संकट दूर व्हावं म्हणून भारतात ठिकठिकाणी होम-हवन आणि पूजा अर्चना केली जातेय. अशातच गोवा राज्यातल्या शाळेत शिक्षकाची नोकरी करणाऱ्या महेश देगवेकर यांनी आपल्याला कोरोनावर आयुर्वेदिक उपचार सापडल्याचा दावा केला आहे. गजानन महाराजांनी आपल्या स्वप्नात येऊन कोरोनावर आयुर्वेदिक उपचार सांगितल्याचं महेश देगवेकर यांचं म्हणणं आहे.

 घटनेची माहिती देगवेकर यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रलयाला दिली. त्यानंतर केंंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देगवेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडून घडलेल्या संपूर्ण प्रकाराची आणि कोरोनावरच्या उपचाराची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर देगवेकर यांच्या दाव्यावर आयुष मंत्रालय अभ्यास करणार असल्याचं श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केलंय.

"देगवेकर यांनी सांगितलेला आयुर्वेदिक उपचार हा अभ्यासासाठी पाठवला जाणार आहे. हा फॉर्म्युला कोरोनावर काळजी घेण्याकडे जास्त लक्ष देतो तसंच यातून लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते अशीही चिन्हं आहेत. त्यामुळे जरी वैज्ञानिक दृष्टीनं कोरोनावर उपचार म्ह्णून हा फॉर्म्युला सिद्ध झाला नाही तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरता येऊ शकतो".असं  श्रीपाद नाईक यांनी म्हंटलंय.

त्यामुळे देगवेकरांच्या दाव्यात किती सत्य आहे याचा अंदाज बांधणं कठीण आहे. मात्र जर त्यांनी सांगितलेला उपाय खरा ठरला तर कोरोनाच्या लाखो रुग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. 

teacher claims that saint gajanan maharaj gave treatment on corona virus 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT