मुंबई

मोठी बातमी : १० रुपयांच्या थाळीला 'आधार'सक्ती..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - १० रुपयात सकस आहार. विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने या थाळीची घोषणा केली. यानंतर यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील झालेलं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी स्वतःहून १० रुपयात थाळी योजना सुरु केली. अगदी जम्मू काश्मीरमध्ये देखील शिवसेनेकडून दहा रुपयात थाळीची योजना सुरु झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात देखील याबद्दल चर्चा झाली आणि प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयात थाळीची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला.

दहा रुपयांच्या थाळीची किंमत जवळपास ५० रुपये आहे. यातील दहा रुपये हे ग्राहकाकडून आणि उर्वरित ४० रुपयांचे अनुदान स्वरूपात राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आहे. याच सबसिडीच्या मुद्द्यवरून विरोधकांनी मोठा आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.  अशातच आता पुन्हा एकदा या थाळीवरून मोठा वादंग निर्माण होणार आहे असं चित्र आहे. 

या दहा रुपयांच्या थाळीत ३० ग्रॅमच्या दोन पोळ्या, १०० ग्रॅम भाजीची वाटी, १५० ग्रॅम मूद असलेला भात आणि १०० ग्रॅम वरण यांचा समावेश असणार आहे. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला केवळ १० रुपयात शिवभोजन  थाळी उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यात ६ कोटी ४८ लक्ष खर्च अपेक्षित आहे. 

काय आहे नवीन नियम ?

महाराष्ट्र सरकारतर्फे रुपयात थाळीचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत तब्ब्ल १५ ठिकाणी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र आता या थाळीसाठी आता आधार कार्डाची गरज भासणार आहे. याचसोबत तुम्हाला तुमचा फोटो देखील देणं बंधनकारक राहणार आहे. ही थाळी घेण्यासाठी एकप्रकारची फोटो आयडेंटिफिकेशन सिस्टीम लागू करण्यात येणार आहे अशी माहिती आता समोर येताना पाहायला मिळतेय.   

दरम्यान,  ही थाळी जर गरिबांसाठी आहे तर अशा प्रकारच्या अटी आणि शर्थी कशासाठी? असा सवाल आता विचारण्यात येतोय. सुरवातीला ३ महिने ही थाळी दहा रुपयात देण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत अधिक माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 

for ten rupees affordable shivbhojan thali aadhar card is mandatory

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC MP Resignation : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, राज्यसभा खासदार प्रकाश चिक बडाईक यांचा तडकाफडकी राजीनामा

Latest Marathi News Live Update : शिर्डीच्या साई संस्थानचा कारभार सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाविना

Gold Rate Today: युद्धाच्या तणावात सोन्याचे भाव कोसळले! उच्चांकापासून 35,000 तर दोन दिवसांत 8 हजारांनी स्वस्त; आजचे ताजे दर पाहा

Ozar Shirdi Road: ओझर-शिर्डी मार्ग रुंदीकरणाला २१३ कोटींची मंजुरी, कुंभमेळा निधीतून होणार काम; वाहतूक, पर्यटन आणि कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार नवे बळ

Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT