मुंबई

त्या महिलेने दोन महिन्याच्या बाळाचे अपहरण केले आणि...

अनिश पाटील : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: दादर रेल्वेस्थानकाजवळून दोन महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना उघड झाली असून, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात एक महिला व तिच्या साथीदाराविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण आणि समाजमाध्यमांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली आहे. आरोपी महिला अनेक दिवसांपासून पाळत ठेवल्यानंतर बाळाचे अपहरण करून हरियानाला पळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मूळच्या वासिंद येथील रहिवासी असलेल्या पूजा अनिल भोसले (२५) कुटुंबीयांसमवेत दादर स्थानकाजवळ भाजीपाला विकतात. दोन महिन्यांचा मुलगा रोशन, आई, वडील व अन्य कुटुंबीयांसह त्या स्थानकाबाहेर पदपथावरच राहतात. नववर्षानिमित्त त्यांनी २८ डिसेंबरला मुलगा रोशनसाठी नवे कपडे खरेदी केले होते. रोशनला ते कपडे घालून त्यांनी पाळण्यात झोपवले होते.

त्यानंतर २९ डिसेंबरला पहाटे पाहिले असता रोशन पाळण्यात नसल्याचे पूजा यांच्या लक्षात आले. त्यानंतर परिसरात शोध घेऊनही रोशन न सापडल्यामुळे त्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरणाची तपासणी केली असता एक महिला बाळाला घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

बाळाच्या कपड्यांवरून आरोपीचा छडा
पूजा भोसले यांनी २८ डिसेंबरला बाळासाठी नवीन कपडे घेतले होते. त्याच दिवशी नवीन कपडे घातलेल्या दोन महिन्यांच्या रोशनचे अपहरण झाले. सीसी टीव्ही चित्रीकरणात बाळाचे पिवळे कपडे स्पष्ट दिसतात. त्यावरूनच आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT