child death sakal media
मुंबई

रायगड : पाण्याच्या टाकीत पडल्याने अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

महाड : येथील औद्योगिक क्षेत्रातील (Mahad MIDC) नांगलवाडी येथे पाण्याच्या टाकीत पडल्याने (child death) एका अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलगा रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) खेड तालुक्यातील रहिवासी असून तो लग्न ठरवण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या वडिलांसोबत आला होता. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

खेड तालुक्यातील हेदली येथील सुधीर झुजम हे आपल्या कुटुंबासह महाडजवळील नांगलवाडी येथे लग्न ठरवण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. मनोहर महाडिक यांच्या घरी हा कार्यक्रम पार पडला. यानंतर जेवण आटोपल्यानंतर हे सर्व जण घरी परतण्यासाठी जात असताना त्यांचा मुलगा श्रेयांश कुठेही न दिसल्याने त्याचा शोध सर्वांनी सुरू केला. या वेळी श्रेयांश हा मनोहर महाडिक यांच्या घराच्या मागील जागेत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडलेला आढळला. त्याला तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तत्पूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. या घटनेची नोंद महाड औद्योगिक पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

SCROLL FOR NEXT