Polio dose
Polio dosesakal media

ठाणे ग्रामीणमध्ये एक लाख २० हजार बालकांना पोलिओ डोस

Published on

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण (Pulse polio vaccination) मोहिमेअंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या एक लाख २० हजार ७५२ बालकांना पोलिओ डोस (Polio dose) देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी सुमारे ८९ टक्के पोलिओ लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे (Dr gangadhar Parage) यांनी दिली. जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सोनावला अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र सागाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील (Pushpa Patil) यांच्या उपस्थितीत शहापूरमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्ह्यात सुमारे १८३१ बुथच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.

 Polio dose
पोस्ट कोव्हिडमध्ये टीबीचे रुग्ण वाढले; मागील दोन महिन्यांत ४३४ रुग्ण

जिल्ह्यात पोलिओ डोससाठी अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या १ लाख ३७ हजार १२० एवढी आहे. त्यापैकी आज १ लाख २० हजार ७५२ बालकांना डोस पाजण्यात आला. उर्वरित बालकांना पुढील तीन ते पाच दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com