Eknath Shinde sakal
मुंबई

Eknath Shinde: ..तर वर्षा निवासस्थानी लावला जाणार वडापाव-चहाचा स्टॉल

सकाळ वृत्तसेवा

राज्यात ‘पथविक्रेता कायदा २०१४’ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. विरोधात ‘महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन’च्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी २७ फेब्रुवारीला राज्यातील फेरीवाले वडापाव-चहाचे स्टॉल लावून निषेध मोर्चा काढणार आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानातून दुपारी १२ वाजता रॅली सुरू होऊन ती ‘वर्षा’ निवासस्थानी धडकणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष अखिलेश गौड यांनी दिली.

रस्त्यावरील पथ विक्रेत्यांचा व्यवसाय संरक्षित करून त्यांचा विकास साधण्यासाठी २०१४ मध्ये कायदा बनविण्यात आला. कायदा बनून आज १० वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राज्यातील ३० लाख पथ विक्रेते त्यांच्या न्याय-हक्कांपासून वंचित राहिले आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी, पदपथावरील गर्दी यासाठी पथ विक्रेत्यांना जबाबदार धरले जाते. राज्य सरकार, महापालिका, नगरपालिका आदींनी पथविक्रेता कायद्याची योग्य अंमलबजावणी केल्यास न्याय मिळेल. सोबत वाहतूक, पदपथ आदी प्रश्न मार्गी लागू शकतात.

राज्य सरकार मात्र एकीकडे पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करायची नाही व दुसऱ्या बाजूला शहर प्रशासनाच्या अपयशाचे खापर गरीब, मेहनती पथविक्रेत्यांवर फोडायचे, असे दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप गौड यांनी केला.

या आहेत मागण्या

फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा, कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत कोणत्याही पथारी व्यावसायिकावर कारवाई करू नये, फेरीवाल्यांचा तत्काळ सर्व्हे करा, कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा, आदी मागण्या फेडरेशनने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT