दहिसर-मुलुंड चेकनाक्यावर
गुटख्याची सौदेबाजी
प्रवीण दरेकर यांचा आरोप
मुंबई, ता. १७ : दहिसर आणि मुलुंड चेकनाक्यावर बाहेरून येणाऱ्या गुटख्याच्या टेम्पोची सौदेबाजी केली जाते, असा आरोप विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज चर्चेदरम्यान केला.
गुटखाबंदी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत श्रीकांत भारतीय यांच्या लक्षवेधी चर्चेदरम्यान दरेकर बोलत होते. दहिसर आणि मुलुंड चेकनाक्यावर काही गुंड प्रवृत्तीचे लोक असून, त्यांना राजकीय पाठबळ आहे. तेथे आलेले गुटख्याचे टेम्पो पकडून तोडपाणी करून सोडून द्यायचे, ही त्यांची पद्धत आहे. याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली. त्यावर या दोन्ही चेकनाक्यांवर वाढीव सुरक्षा लावून कठोर कारवाई केली जाईल, असे उत्तर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.