बहुमत असूनही महायुतीच्या आमदारांमध्ये चर्चेची असोशी नाही; खेदाची बाब म्हणजे विरोधकांतही ती दिसत नाही.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे दुसरे अधिवेशन, ज्याचे आज सूप वाजणार आहे. त्यातून सर्वसामान्य लोकांसाठी काय निष्पन्न झाले, असा प्रश्न विचारला तर ‘भोपळा’, असेच म्हणावे लागते. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचे प्रश्न इतके बिकट असतात की सरकार, सत्ता त्यातून मिळणारी कंत्राटे हे सर्व त्यांच्या नावावर सुरू असते, हे त्या भोळ्या जनतेच्या गावीही नसते.