पत्रकारांसाठी
एआयचे प्रशिक्षण
मुंबई, ता. १३ : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्यातर्फे पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एआय’ तंत्रज्ञान आधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून, यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ वाचेल. कौशल्य विकासासाठीच हा उपक्रम राबविला असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. जगभरात आता विविध क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून, प्रसिद्धी माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचेही ते म्हणाले. पत्रकारांना या कार्यशाळेचा दैनंदिन कामकाजात नक्कीच अधिक उपयोग करता येईल. तसेच कामामध्ये अधिक तंत्रस्नेहीपणा आणता येईल, असेही ते म्हणाले.