शिवसेनेचे
प्रभारी जाहीर
मुंबई, ता. १३ : आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेकडून आज ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. यात शिवसेनेने मंत्री, खासदार, आमदारांवर जबाबदारी निश्चित केली आहे. या प्रभारींना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाची धोरणे, विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.