Aditi Tatkare sakal
मुंबई

Aditi Tatkare: पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी राज्य शासन कटिबद्ध; मंत्री अदिती तटकरे यांचे विधान

CD

Aditi Tatkare: कोकणातील विस्‍तीर्ण समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. पर्यटन महोत्सवासारख्या कार्यक्रमात हजारो पर्यटकांची उपस्थिती लाभते. त्यांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून आगामी काळात विकासात्मक कामे करून पर्यटन वृद्धीसाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुरूड येथील पर्यटन महोत्सवात केले.

या वेळी अदिती तटकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, की मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत केंद्र व राज्याच्या असणाऱ्या महिला धान योजना एका छताखाली आणून जास्तीत जास्त महिलांचे प्रस्ताव कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असणार आहे. या वेळी पाक कला स्पर्धेत शाकाहारी विभागात प्रथम क्रमांक सुश्मिता गुरव, द्वितीय क्रमांक वंदना नाझरे, तृतीय क्रमांक जयश्री प्रधान यांनी पटकावला.

तर मांसाहारी विभागात प्रथम क्रमांक साची घरत, द्वितीय क्रमांक सायली घरत; तर तृतीय क्रमांक सिया अपराध यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ३१ डिसेंबरचे औचित्य साधून सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी आनंद लुटला.

सुमारे २० हजारांहून अधिक रसिकांनी समुद्रकिनारी लावणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली; तर यूट्युब व लिंकच्या माध्यमातून लाखो लोकांनी हा कार्यक्रम घरी बसून पाहिला. या वेळी मुरूड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी व्यासपीठावर पर्यटन महोत्सव समितीच्या अध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादी मुरूड तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, शिवसेना मुरूड शहर अध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका मेघाली पाटील, माजी नगरसेविका युगा ठाकूर, पर्यटन महोत्सव उपाध्यक्ष प्रकाश सरपाटील, उपाध्यक्ष वीरेंद्र भगत, राष्ट्रवादी मुरूड शहर अध्यक्ष संजय गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT