Aditi Tatkare : ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा; 3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत; आदिती तटकरे

आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी ताई आणि शिक्षक भारती शिष्टमंडळा सोबत अदिती तटकरे यांची बैठक
anganwadi teachers status of pre-primary teacher conversion of 3 thousand Mini Anganwadis into Big Anganwadis Aditi Tatkare
anganwadi teachers status of pre-primary teacher conversion of 3 thousand Mini Anganwadis into Big Anganwadis Aditi Tatkare

तिसंगी : अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल (28 नोव्हेंबर) मंत्रालयात आमदार कपिल पाटील यांना दिले.

आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी ताई आणि शिक्षक भारती शिष्टमंडळा सोबत अदिती तटकरे यांची काल बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारतीच्या नेत्या मायाताई म्हस्के, सुरेखा घाडगे, आशाताई देशमुख, प्राथमिक शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, संघटक प्रकल्प पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत अदिती तटकरे यांनी 3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार देण्याचे मान्य केले, हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करण्याचे , थकीत बिलं तातडीने देण्याचे मान्य केले, अंगणवाडी ताई यांना दर्जेदार मोबाईल देण्याचे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे मान्य केले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव आणि आयुक्त उपस्थित होते. आमदार कपिल पाटील आणि पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारती यांच्या पुढाकाराने झालेली ही बैठक अंगणवाडी ताईंसाठी दिलासादायक आहे, असे मत मायाताई म्हस्के यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com