मुंबई

नालासोपारा स्टेशन परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरूवात

CD

विरार, ता. ४ (बातमीदार) : नालासोपारा पश्चिमेकडे उड्डाणपुलाखालील स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्याचे डांबरीकरण न झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले होते. नालासोपारा स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाल्याने या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या डांबरीकरणाची मागणी रिक्षा चालक - मालक संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी शिवसेनेकडे केली होती. याबाबत शिवसेनेकडून उपोषण करण्यात आले होते. यावेळी प्रभाग समिती ‘ई’चे सहायक आयुक्त यांनी लेखी आश्वासनानंतर रात्रीच खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. महिला आघाडी शहर संघटक रुचिता नाईक, शहरप्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख किरण काळे, उपविभागप्रमुख सचिन परब यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT