Eknath Shinde, devendra Fadanvis  Esakal
मुंबई

Palghar Politics: पालघरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच; नक्की कोणाला मिळणार जागा?

CD

Palghar Politics: पालघर लोकसभा उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय व राज्यस्तरीय महायुतीकडून उमेदवार घोषित केला जाईल. बोईसर येथे शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे विभागीय संपर्कप्रमुख नरेश मस्के यांनी पालघर लोकसभेचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित हेच राहतील, असे जाहीर केले होते.

मात्र महायुतीने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पालघर लोकसभा प्रभारी राणी द्विवेदी यांनी वरिष्ठ पातळीवर अजूनही उमेदवार ठरलेला नाही, असे सांगितले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील महायुतीच्या १५ घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित पत्रकार परिषद पालघर येथे आयोजित केली होती. या वेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सरचिटणीस राणी द्विवेदी, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभा समन्वयक मनोज गरोडा, नरेंद्र पाटील; तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, वसंत चव्हाण, राजेश शहा, खासदार राजेंद्र गावित, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आनंद ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वरिष्ठांकडून जो उमेदवार ठरविला जाईल, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, या सर्वांची माहिती देण्यासाठी मेळावे आयोजित केल्याची माहिती राणी द्विवेदी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत महायुतीमधील १५ घटक पक्षांपैकी फक्त चार घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आपल्यामध्ये समन्वय दिसून येत नाही, असा प्रश्‍न विचारण्यात आला.

त्या वेळी राणी द्विवेदी यांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर अजून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. महायुतीचा उमेदवार हा ज्येष्ठ पदाधिकारी ठरवतील, त्याच उमेदवाराला सर्व घटक पक्ष निवडून देतील. महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये एकमेकांचा समन्वय नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा निर्माण करणार, असाही प्रश्न पत्रकारांनी केला, मात्र यावर त्यांनी उत्तर देण्याची टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : राहुल गांधी यांच्यासह 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसेस गांधी स्मृती येथे पोहोचल्या

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT