Crime News sakal
मुंबई

Bhiwandi News: तुपानंतर आता भिवंडीत बनावट जिऱ्याचा कारखाना पोलिसांनी केला सील

CD

Crime News: नंडोरे येथे बनावट जिरेनिर्मिती कारखाना पोलिसांनी शनिवारी सील केला. या ठिकाणी रसायने वापरून जिऱ्याची निर्मिती केली जात होती. या बनावट जिऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


भिवंडी येथे बनावट जिरे विक्री करण्यासाठी काही जण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पालघरमधून शाबाद इस्लाम खान, तर कांदिवली पश्चिमेतून चेतन रमेश गांधी अशा दोघांना ताब्यात घेतले. आरोपीची अधिक चौकशी केली असता पालघर येथील बनावट जिरा कारखान्याचा तपास लागला.

पोलिस आयुक्त नवनाथ ढवळे, सहायक आयुक्त ईश्वर खैरनार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या इंदलकरांच्यापथकाने सापळा रचून नागाव फातिमा नगर येथे एक संशयित टेम्पो जप्त केला. त्यात ८० गोण्यांमध्ये सात लाख २१ हजार सातशे रुपये किमतीचे बनावट जिरे पोलिसांनी जप्त केले.

त्यानंतर नंडोरे येथील नोव्हेल इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये जागृती एंटरप्राइजेस नावाचा बनावट जिरेनिर्मिती कारखाना सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सदर कारखाना हा सील करण्यात आला. दरम्यान येथील माजी सरपंच दिनेश कान्हात यांनी नंडोरे ग्रामपंचायतीकडे सदर कारखान्याच्या परवानगीबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती कान्हात यांनी दिली.

कच्चा माल गुजरातमधून


लाकडाचा भुसा व रसायने, बडीशेपचा काढून टाकलेला टोकाचा भाग बनावट जिरे तयार करण्यासाठी वापरला जात होता.

त्यासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधील उंझा इथून आणला जात होता. या बनावट जिऱ्याची ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आदी परिसरातील हॉटेलवर तसेच धाब्यांवर मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती. बनावट जिरे पाण्यात टाकले असता त्यातून काळा रंग आणि रसायने पाण्यात मिसळली जातात.

बाजारात कमी दराने विक्री


बनावट जिऱ्याचा वापर जिरा राईस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बाजारात साडेचारशे रुपये किलो दराने विकल्या जात असलेल्या मूळ जिऱ्यापेक्षा हे बनावट जिरे अडीचशे ते तीनशे रुपये किलो इतक्या कमी दराने विकले जात होते. त्यामुळे व्यावसायिकांची या बनावट जिऱ्याला पसंती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Petrol-Diesel Rate: 4 जूनला पेट्रोल-डिझेल आणि CNGचे नवे दर जाहीर! मुंबई, पुणेसह तुमच्या शहरातील ताजे भाव पाहा

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

SCROLL FOR NEXT