मुंबई

मुरबाडकरांच्या भावनांशी ‘गुगल’कडून खेळ

CD

मुरबाड, ता. ११ (वार्ताहर)ः मुंबईतील रेल्वेचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ ऊर्फ मिरकुटे यांच्या जन्मस्थळाबाबत गुगलने दोन परिच्छेदांमध्ये वेगवेगळी माहिती दिली आहे. यानुसार नाना शंकरशेठ यांचा मुंबईत जन्म झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसऱ्या परिछेदात जन्मस्थळ म्हणून मुरबाडचा उल्लेख असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ ऊर्फ मिरकुटे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला, अशी माहिती आतापर्यंत गुगलवर उपलब्ध होती. त्यामुळे मुरबाड हेच नानांचे जन्मगाव असल्याची माहिती जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचली. पण गुगलवरील या माहितीमध्ये बदल करून जीवन परिचयामध्ये दुहेरी माहिती नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला नानांचा जन्म मुंबईत तर दुसऱ्या उताऱ्यामध्ये त्यांचा जन्म मुरबाडमधील एका दैवज्ञ ब्राह्मण सोनार कुटुंबात झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे जन्मस्थळावरून एकीकडे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात जन्मस्थळ असल्याचा सार्थ अभिमान असलेल्या मुरबाडकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सरकारने याबाबतची माहिती प्रसारित करून नेमकी माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश घरत यांनी केली आहे.
-------------------------------------
नाना शंकरशेठ मुरबाडचे भूमिपुत्र असल्याचा सार्थ अभिमान आहे. परंतु गुगलने प्रसारित केलेल्या नव्या माहितीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खरी माहिती सर्वांसमोर येण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
- रमेश घरत, सामाजिक कार्यकर्ते, करचोंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्यसरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT