उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले असून त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे. मुलुंड मधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला असून यातील साठ वर्षीय कांचन गोहिल यांच्या कुटुंबातील प्रतीक गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 31 जुलै ला निघालेला हा ग्रुप दरड कोसळल्यानंतर उत्तराखंडमधील गंगोत्री येथील एका हनुमान आश्रममध्ये अडकून असल्याचा शेवटचा फोन त्यांना आला होता. या सर्वांना लवकरात लवकर रेस्क्यू केले जावं आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जावं अशी मागणी प्रतीक गोहिल यांनी प्रशासनाकडे केली आहे.
ओबीसी समाज हा देशाच्या पाठीचा कणा आहे. देश घडवण्यासाठी ओबीसींचं मोठं योगदान आहे. मी सुरुवातीपासूनच ओबीसी चळवळीसोबत काम करतोय आणि इथून पुढेही करत राहीन, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५% कर लादण्याच्या निर्णयावर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "त्याचा निश्चितच परिणाम होईल कारण आपला त्यांच्याशी ९० अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जर सर्व उत्पादने ५०% महाग झाले तर खरेदीदारांनाही वाटेल की त्यांनी भारतीय उत्पादने का खरेदी करावीत? ... जर त्यांनी असे केले तर आपण अमेरिकन निर्यातीवरही ५०% कर लादला पाहिजे ... असे नाही की कोणताही देश आपल्याला अशी धमकी देऊ शकतो..."
ED कडून ₹750 कोटींच्या GST घोटाळ्याप्रकरणी रांची, कोलकाता आणि मुंबई येथे एकूण ८ ठिकाणी छापेमारी सुरू आहे. छाप्यांच्या दुसऱ्या टप्प्यात शिवकुमार देओरा व त्यांच्याशी संबंधित गटाच्या मालमत्तांवर तपास सुरू आहे.
परभणी तालुक्यातील दैठणा येथील मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांचा चार चाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून दोन किमी माळ सोना फाट्याजवळ हा अपघात झाला असून दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे पुष्पा उत्तम कछवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी उत्तमराव कच्छवे यांच्या पत्नी,तर अजनाबई सुरेशराव शिसोदे असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत
मंत्र्यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा जाहीर झाला आहे. त्यानंतर ठेकेदारांकडून रस्ता सुस्थितीत असल्याचं दाखवण्यासाठी धडपड सुरू आहे. महामार्गाची पाहणी मंत्री करणार म्हणून ठेकेदारांची पॅचवर्क आणि खड्डे भरण्याची लगबग सुरू झालीय. महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील डायवर्शन सुद्धा काढण्याचे काम केलं जात आहे. कांटे ते निवळी असा रखडलेला मुंबई गोवा महामार्गावरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. सकाळपासून ठीक ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचा देखील काम सुरू आहे.
दादर येथील कबूतर खाना इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतर खाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते अचानक जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतर खाण्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली.
परभणी तालुक्यातल्या दैठणा इथं मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून दोन किमी माळ सोना फाट्याजवळ अपघात झाला. पुष्पा उत्तम कच्छवे आणि अंजनाबाई शिसोदे असं मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला वैयक्तिकरित्या माहित आहे की मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु मी त्यासाठी तयार आहे. आज, भारत देशातील शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तयार आहे..."
धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये पोलिस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला कऱण्यात आला आहे. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. यात शिथिलता देण्यात आली आहे दरम्यान पोलिस आज गावकऱ्यांसोबत शांतता बैठक घेणार आहेत.
पुणे : कोथरूड परिसरातील एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुणे विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण रद्द केले. विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या, पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उड्डाण्याच्या तयारीत असलेलं 1098 हे विमान रद्द करावा लागला आहे.
हुबळी : राज्यातील तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरपर्यंत निश्चितपणे घेण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांनी केली आहे.
बंगळूर : येथील जेबीनगर पोलिस ठाण्याने मोटारचालकाविरोधात भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना तीन ऑगस्ट रोजी एचएएल तिसऱ्या स्टेजमधील बेकरीसमोर घडली होती. याप्रकरणी स्थानिक रहिवासी अभिजित दास यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘केए-०३, एनएस ३३३०’ या क्रमांकाची मोटार चालवणाऱ्या अनोळखी व्यक्तीने बेकरीसमोर झोपलेल्या कुत्र्यावर गाडी चालवली. यामुळे कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस मोटारीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास सुरू आहे.
कोल्हापूर : महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी वनतारा आणि महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा कोल्हापूरच्या जनरेटा तयार केला. त्यामुळेच शक्य झाले. मात्र, जोपर्यंत मठामध्ये महादेवी परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. आज जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
शिरोळ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २६ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणास बसण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी आज (ता. ७) मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली. मराठा आरक्षण लढा निर्णायक ठरवण्यासाठी मराठा समाजाने २९ ऑगस्टला मुंबईत येण्यासाठी जरांगे यांचा जागर दौरा सुरू आहे. त्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शिरोळमध्ये येणार आहेत. येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज तक्तात बैठक होणार असून, बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख चुडमुंगे यांनी केले आहे.
Latest Marathi Live Updates 7 August 2025 : वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे. तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. तसेच रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर आणखी २५ टक्के एवढे आयातशुल्क लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारी करारावरून सुरू असलेली बोलणी अद्याप निर्णायक पातळीवर पोहोचली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यामध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.