मुंबई

आज अमेरिकेतील पहिली-आठवीच्या मूल्यमापन परीक्षेचा निकाल

CD

अमेरिकेतील पहिली-आठवीच्या मूल्यमापन परीक्षेचा आज निकाल
मुंबई, ता. ८ : राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे अंतर्गत बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिकेद्वारे इयत्ता पहिली ते आठवीतील मराठी भाषा विषयासाठी प्रवेश घेतलेल्या मार्च २०२५च्या मूल्यमापन परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. ९) ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या कॅनडा, डेन्मार्क व अमेरिकेतील एकूण ६० शाळा आणि केंद्रामधून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचे १०३ विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत पहिल्यांदाच प्रवेश‍ित झाले होते. यासाठी बालभारतीने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी भाषा विषयांच्या पुस्तकांचा अभ्यास करून हे विद्यार्थी १८ मे रोजी घेण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन परीक्षेला बसले होते. त्या विद्यार्थ्यांचा निकाल बुधवारी दुपारी २ वाजता www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव प्रमोद गोफणे यांनी दिली.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाकडून अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी मागील वर्षी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार ही मूल्यमापन परीक्षा आयोजित केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh 2025 : भारत बंद आज, २५ कोटी कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरु अन् काय बंद राहणार?

Murder Case: 'अनैतिक संबंधातून शिवथरमधील विवाहितेचा खून'; पुण्यातून एकास अटक, पुजाचा पळून जाण्यास नकार अन्..

मोठी बातमी! स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या ‘इतक्या’ शाळांमध्ये पूर्वीपासूनच हिंदी भाषा; ‘SCERT’च्या नव्या परिपत्रकामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा दोनच भाषा

अंगणवाडी सेविकांचा एल्गार! सेवानिवृत्तीनंतर सेविकांना अवघे एक लाख रुपये, मदतनिसांना मिळतात केवळ 75000 रुपये; पेन्शन नाही अन्‌ कामाच्या तुलनेत मानधनही अपुरे

आजचे राशिभविष्य - 9 जुलै 2025

SCROLL FOR NEXT