सातारा : शिवथर येथील विवाहिता पूजा प्रथमेश जाधव (वय २५) हिचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी सातारा पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास पुणे येथून अटक केली. अक्षय रामचंद्र साबळे (वय २९) असे त्याचे नाव असून, तो शिवथर येथीलच रहिवासी आहे. या कारवाईनंतर हे कृत्य अनैतिक संबंधातून घडले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.