मुंबई

''माझी टीएमटी'' ॲपवर बसचे वेळापत्रकच नाही

CD

‘मीझी टीएमटी’वर बस वेळापत्रकाला ब्रेक
तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे पालिकेच्या परिवहन विभागाने हायटेक प्रणालीचा वापर करीत बसचे तिकीट काढण्यासाठी ‘मीझी टीएमटी’ हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. या ॲप्लिकेशनला ठाणेकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी या ॲप्लिकेशनवर तिकीट काढण्यासह बसचे वेळापत्रकाच्या माहितीचा पर्याय दिला आहे; मात्र हा पर्यायावर क्लिक केल्यानंतर बसच्या वेळेबद्दलची कोणतीच माहिती मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
ठाणे परिवहनसेवेचे चाक खोलात जात असताना, परिवहनसेवेला उभारी मिळावी, यासाठी ठाणे परिवहनसेवेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यातच डिझेलवर होणारा खर्च कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक अशा सीएनजी व इलेक्ट्रिक बस परिवहनसेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्या माध्यामतून ठाणेकरांना परिवहनसेवा देण्यात येत आहे. त्यात परिवहनसेवेतील बस गाड्यांमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये नेहमीच वाद होत होते. या समस्येवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने ‘माझी टीएमटी’ हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. या ॲप्लिकेशनवर प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढता येत आहे.
बऱ्याच वेळ बसथांब्यावर बसची वाट पाहत उभे असताना, प्रवासी ‘माझी टीएमटी’ ॲपवर बस येण्याची वेळ पाहण्यासाठी ‘बस टाईम्स’ या पर्यायावर क्लिक करतात. त्यावर ‘लवकरच येत आहे’ असे दिसते. त्यामुळे काम पूर्ण झालेले नसतानाही ॲप्लिकेशन सुरू करण्याची लगीनघाई का, असा सवालदेखील प्रवाशांमधून विचारला जाऊ लागला आहे.
-------------------------------------------
माहिती उपलब्ध नाही
‘मीझी टीएमटी’ ॲप्लिकेशनद्वारे दररोज पाच ते सहा हजार प्रवासी तिकीट काढत आहेत. तसेच प्रवाशांना बसचे वेळापत्रक समजावे, यासाठी या ॲप्लिकेशनवर बसच्या वेळापत्रकाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असले तरी त्या पर्यायावर माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनीषा मुसळे माने यांचा पोलिसांना नवा अर्ज! डॉ. शिरीष यांच्यासह पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याच्या ऑडिटची मागणी

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2025

Panchang 18 July 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : तेथे पैजाराचे काम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2025

SCROLL FOR NEXT