मुंबई

अंबरनाथला प्रथमच नगरपथ विक्रेता समिती निवडणूक

CD

अंबरनाथ, ता. १७ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये प्रथमच झालेल्या नगरपथविक्रेता समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत सहा जण बिनविरोध निवडून आले. तर निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित असलेल्या एका जागेवर ज्योती हुमणे निवडून आल्या आहेत.
अंबरनाथमध्ये यंदा प्रथमच राज्याच्या कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार नगरपथविक्रेता समिती सदस्यांसाठी निवडणूक झाली. मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. कामगार नेते श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील लेबर फ्रंट फेरीवाला युनियनचे चार, तर रिपब्लिकन हॉकर्स युनियनचे पुरुषोत्तम नल्लासेवी यांच्या संघटनेचे तीन उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग महिला राखीव, इतर मागास प्रवर्ग एक, विकलांग प्रवर्ग एक असे सहा उमेदवारी अर्ज विहित मुदतीत दाखल झाले होते.
अनुसूचित जाती प्रवर्ग या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी जयश्री शिंदे आणि ज्योती हुमणे दोन महिलांचे उमेदवारी अर्ज आल्याने नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी (ता. १७) मतपत्रिकेद्वारे गुप्त मतदान निवडणूक घेण्यात आली. यामध्ये ज्योती हुमणे यांना ३०७, तर जयश्री शिंदे यांना १८० मते मिळाली. त्यामुळे हुमणे यांना विजयी झाल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी म्हसे यांनी जाहीर केले. महिलांसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज सादर न झाल्याने जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत ७३ मते बॅड झाली. नगरपालिकेतर्फे जितेंद्र गोसावी आणि नगरपथ विक्रेता समितीच्या अधिकारी ज्योती आव्हाड आदींनी सहकार्य केले.

बिनविरोध विजयी उमेदवार
सर्वसाधारण प्रवर्ग - जगन्नाथ ओगले, पुरुषोत्तम नल्लासेवी करपण,
सर्वसाधारण प्रवर्ग महिला राखीव - माया गायकवाड,
इतर मागास प्रवर्ग - मोहन धस,
अल्पसंख्याक प्रवर्ग - शमीम शेख,
विकलांग / दिव्यांग प्रवर्ग - शंकर दोडके

फेरीवाला झोन निर्मितीची मागणी
फेरीवाल्यांना परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्न असेल. नगरपालिकेने फेरीवाला झोनची निर्मिती करावी, नगरपालिकेने संरक्षण मिळवून द्यावे, फेरीवाल्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, असे मत लेबर फ्रंट फेरीवाला युनियनचे श्यामदादा गायकवाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनीषा मुसळे माने यांचा पोलिसांना नवा अर्ज! डॉ. शिरीष यांच्यासह पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याच्या ऑडिटची मागणी

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2025

Panchang 18 July 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : तेथे पैजाराचे काम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2025

SCROLL FOR NEXT