‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’चा जल्लोष
६५ कबड्डी संघांसह पारंपरिक-आधुनिक खेळांचा संगम!
मुंबई, ता. १३ (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’मध्ये पारंपरिक आणि आधुनिक खेळांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ६५ संघांच्या सहभागासह लोकप्रिय पारंपरिक खेळ कबड्डीच्या स्पर्धांना गुरुवारी (ता. १३) दिमाखात सुरुवात झाली आहे.
या स्पर्धा बोरिवली पश्चिमेकडील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होत असून, त्यांचा अंतिम सामना रविवारी (ता. १६) खेळवला जाईल.
गेल्या दोन दिवसांत (१२ व १३ नोव्हेंबर) क्रिकेट, फुटबॉल आणि कॅरमच्या सामन्यांनाही खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फुटबॉलमध्ये सुमारे १,८०० खेळाडूंसह १५० संघ सहभागी झाले आहेत, तर कॅरम स्पर्धेत १२५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. हा महोत्सव २ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, यात आतापर्यंत बुद्धिबळ, खो-खो, कुस्ती, स्केटिंग, वॉकथॉन आणि सायक्लोथॉनसारख्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात टेबल टेनिस, मॅरेथॉन, पिकलबॉल, बॉडीबिल्डिंग आणि साडीथॉनसह अनेक खेळांचे सामने होणार आहेत.
महाराष्ट्राच्या पारंपरिक खेळांबद्दलचा उत्साह आपल्या सांस्कृतिक आत्मविश्वासाचे आणि लोकशक्तीचे प्रतीक आहे. मी सर्व नागरिकांना, विशेषत: ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांना आवाहन करतो, की साडीथॉन, मल्लखांब, टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल अशा येणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा आणि या क्रीडा पुनर्जागरणाचा भाग बना!
- पीयूष गोयल, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.