मुंबई

राज्य पोलिस कोरोनामुक्तीच्या दिशेने? बाधित पोलिसांची संख्या घटली 

अनिश पाटील

मुंबई ः कोरोना संकटात राज्य पोलिस दलात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये कमालीची घट झाली आहे. जूननंतर ऑक्‍टोबरमध्ये राज्यात सर्वांत कमी म्हणजे 37 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दलाला हा दिलासा मिळाला आहे. 

सप्टेंबर महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठला असताना ऑक्‍टोबरमध्ये कोरोना लागण झालेल्या पोलिसांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. याशिवाय ऑक्‍टोबरमध्ये 4574 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुतांश पोलिस कामावर रुजूही झाले आहेत. सध्या राज्य पोलिस दलात 1386 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर 24 हजार 919 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, सध्या राज्य पोलिस दलातील 10 हजार 247 पोलिस विलगीकरणात आहेत. 

मृत्यू दृष्टिक्षेपात 
एप्रिल- 03 
मे- 23 
जून- 33 
जुलै- 43 
ऑगस्ट- 54 
सप्टेंबर- 91 

पोलिसांना झालेली लागण 
जुलै- 5,000 
ऑगस्ट- 6,077 
सप्टेंबर- 8,254 
ऑक्‍टोबर- 3,043 

मुंबई पोलिस दलात 274 रुग्ण 
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू मुंबई पोलिस दलात आहेत. शनिवारी 10 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 6797 वर पोहोचला आहे. शिवाय 92 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी मुंबई पोलिस दलात सध्या केवळ 274 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या सात दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली. गेल्या सात दिवसांत अनुक्रमे 10, 13, 21, 16, 6, 12 व आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. मुंबई पोलिस दलातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

Online Fertilizer Sales : ऑनलाईन खत विक्रीमुळे शेतकरी मेटाकुटीस; राज्यातून फक्त दोनच जिल्हयांसाठी जाचक अटी

CJP Pune Protest: जंतरमंतर नंतर कॉकरोच जनता पक्ष पुण्यात आंदोलन करणार! कधी आणि कुठे? पार्टीने तारीख आणि ठिकाण सांगितलं

Latest Marathi News Update : राज्यासह देशात काय घडलं? जाणून घ्या...

Sakal Auto Expo 2026 : ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ १३ व १४ जूनला; वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

SCROLL FOR NEXT