स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात; रोहित पवारांचा घणाघात

तुषार सोनवणे
Sunday, 1 November 2020

राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी थेट पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. परंतु रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्याला जाणीवपूर्वक वेळकाढू पणा करीत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे.

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम

कोरोना काळातही श्रमिक ट्रेन, कोकण स्पेशल आदी ट्रेन चालवण्याबाबत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात खटके उडत होते. आता सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार आग्रही असले तरी, रेल्वे प्रशासन त्याला जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी थेट पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे.

गर्भवती महिलेच्या घटस्फोटासाठी कुलिंग कालावधी माफ: हायकोर्ट

श्रमिक रेल्वेंबाबत राज्य सरकारने डिटेल्स अजूनही का देत नाही अशी मध्यरात्रीपर्यंत ट्विट करून तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे राज्य सरकारच्या लोकल सुरू करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटून गेले तरी निर्णय का घेत नाही याचे आश्चर्य वाटते, असे म्हणत रोहित पवार यांनी रेल्वेमंत्र्यावर निशाणा साधला आहे. स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात अशी टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.

----------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar criticizes Railway Minister Piyush Goyal on local train issue