Mumbai Police Crime Branch esakal
मुंबई

Mumbai Police : मुंबई पोलिसांची बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई; 'इतक्या' महिलांना केलं अटक

मुंबई पोलिसांनी बांगलादेशी महिलांविरोधात (Bangladeshi Women) धडक कारवाई सुरु केलीये.

सकाळ डिजिटल टीम

दोन्ही महिलांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडं भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नव्हतं.

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी बांगलादेशी महिलांविरोधात (Bangladeshi Women) धडक कारवाई सुरु केलीये. मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोहीम उघडली आहे.

मुंबई पोलिसांनी मागील सहा महिन्यात पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी, बोरिवली दहिसर गणपत पाटील नगर यांसारख्या परिसरातून दहापेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. अशाच पद्धतीनं अवैधरित्या मुंबईच्या दहिसर परिसरात राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 12 ने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्हीही बांगलादेशी महिला फेब्रुवारी 2023 पासून मुंबईच्या दहिसर परिसरात राहत आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांचं वय वीस व असून 29 वर्ष असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरात दोन बांगलादेशी महिला फेब्रुवारी 2023 पासून अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे सपोनि रासकर यांना मिळाली.

या माहितीवरून दोन्ही महिलांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा पत्ता शोधून काढला. मिळालेल्या पत्त्यावरून त्या दोन्हीही महिलांचा शोध घेतला. त्या दोन्ही महिलांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडं भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नव्हतं.

त्यांच्या फोनमधील नंबर तपासून पाहिले असता त्यांचं संभाषण नेहमी बांगलादेशमधील त्यांच्या नातेवाईकांसोबत होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या दोघीही बांगलादेशी असल्याची खात्री पटली, म्हणून त्या दोघींनाही गुन्हे शाखा कक्ष बाराच्या टीमनं ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.

प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सपोनि विजय रासकर, कारंडे, लक्ष्मण बागवे, कल्पेश सावंत, बालकृष्ण लिम्हण, विनोद अहिरे, संतोष बने, शैलेश बिचकर, अमोल राणे, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, शैलेश सोनावणे, चंद्रकांत शिरसाट,आण्णा मोरे या तपास पथकानं ही यशस्वी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Latest Marathi News Live Update: खरात प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील कोर्टात दाखल

SCROLL FOR NEXT